☣️ आधारभूत धान खरेदी केंद्र अडचणी बाबद शासनाची बैठक

 ☣️ आधारभूत धान खरेदी केंद्र अडचणी बाबद शासनाची बैठक 

_Breaking Updates_


शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत हंगाम खरीप सन 2023-24 साठी शेतकरी नोंदणी अध्याप सुरु झालेली नसून, यावर समस्त लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य दि. 01/11/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता समिती कक्ष, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हील, मुंबई. येथे बैठक आयोजित केल्याचे शासनाच्या पत्राने कळविले आहे.



🔰 खरेदी केंद्राच्या अडचणी  

शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत शासन मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळा यांच्या मार्फत सब एजेंट अधिकृत संस्था 'अ' वर्ग व 'ब' वर्ग यांना शासन नर्णयाप्रमाणे धान खरेदी करण्याचे आदेश प्राप्त होत असे, परंतु चालू हंगामात शासनाच्या नियमांत बदल झाल्याने खरेदी केंद्राच्या अडचणी वाढल्या.

🔰 शासनाचे नवे नियम 

1. सब एजेंट संस्थांना धानात येणारी घट 0.5 % मंजूर करण्यात आले आहे, 0.5 % पेक्षा जास्त घट आल्यास दीड पट रक्कम सब एजेंट संस्थांकडून वसूल करण्यात येईल.

2.सब एजेंट संस्थांना बँक गॅरंटी किंवा एफ.डी.आर जमा करुन धान खरेदी करता येईल.

('अ' वर्ग सभासद संस्था यांना वीस लाख रुपये तर 'ब' वर्ग सभासद संस्था यांना एक करोड रुपये) इतकी रक्कम जमा करुनच धान खरेदी करता येईल.

🔰 समस्त शेतकऱ्यांचा धान कापणी झाली असून सामोरं दिवाळी हा सण असल्यामुळे धान विक्री करीता बाजारात हमी भावा पेक्षा कमी किंमतीत विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यांचा मोठ्याने नुकसान होत आहे.


शेतकऱ्यांनी धीर धरावे होणाऱ्या बैठकीत शासन काय निर्णय घेणार या वर लक्ष वेधून पुढील शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत हंगाम खरीप सन 2023-24 साठी शेतकरी नोंदणी करीता तयार राहावे.

🔰 नोंदणी कुठे करायची ?

आपल्या जवळच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकरी नोंदणी करून घ्यावी.

🔰 नोंदनी करीता लागणारे कागदपत्रं -

• 7/12 सत्यप्रत ( 7/12 वर खसरा भरलेला असावा धान्याचे नाव व वर्ष असावा )

• नमुना 8 सत्यप्रत

• आधार कार्ड झेरॉक्स (आधार ला मोबाईल क्रमांक लिंक असावा)

• बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक झेरॉक्स

• शेतकरी नोंदणी अर्ज

• संमती पत्र ( 5 रु कोर्टाची टिकिट )

• बँक हमीपत्र

• स्वयं घोषणा पत्र

• पासफोटो

• मोबाईल क्रमांक 

🔰 MSP मार्फत मिळणारे दर किती ?

🔹साधारण धान दर 2183 रू प्रती क्विंटल

🔹एफ यू दर्जेचा धान दर 2203 रू प्रती क्विंटल

🔰 खरीप पणन हंगाम 2023-24 धान खरेदी योजनेची मुद्दत किती आहे ?

राज्यात धान व भरडधान्य खरेदी सुरु करण्याबाबतच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पणन हंगाम 2023-21 (खरीप) मधील धान खरेदीसाठी दि.1 ऑक्टोंबर 2023 ते दि.31 जानेवारी, 2024 असा कालावधी व भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येतील अशा सुचना आहेत.

वरील महिती शेतकऱ्यांच्या खूप महत्त्वाची आहे कृपया सर्व शेतकरी बांधवांना पाठवावे.

🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मदतगार वर . . .




Comments